- भद्रावती वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे निर्दशने
भद्रावती -
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हातील चांदपा परिसरातील एका गावातील 19 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. येथील युवतीवर झालेल्या अत्याचाराची भद्रावती येथील वंचित बहुजन महिला आघाडीने दखल घेतली असून सदर पिढीत युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महिला आघाडी तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निर्दशने करून घटनेचा तीव्र निषेध दर्शविला यावेळी समस्त वंचित बहुजन आघाडीच्या महिला आणि पूरुष कार्यकर्त्यांनी युपी योगी सरकारच्या विरोधात घोषणा देत या घटनेतील नराधमांना त्वरित कठोर शिक्षा देऊन फक्त फाशीच द्यावी व त्या पीडित युवतीस योग्य न्याय द्यावा. व योगी सरकार बरखास्त करावे अशी मागणी बहुजन वंचित महिला आघाडी तर्फे करण्यात आले. असे निवेदन तहसीलदार यांना सादर केले.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.