Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना काळात कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा करावी : आमदार बंटीभाऊ भांगडीया
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सेवा सप्ताह निमित्त मासळ येथील बैठक मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर - मागील दहा महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर आहे. ...

  • सेवा सप्ताह निमित्त मासळ येथील बैठक
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -

मागील दहा महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर आहे. तेव्हा राज्य शासनाने कोरोना महामारीत जनतेला मोफत धान्य दिले नाही सिलेंडर चा मोफत पुरवठा केला नाही. वाढलेले विजेचे बिल कमी करण्यात आले नाही. कोरोना काळात राज्य शासनाकडून जनतेला कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही परंतु पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकार कडून धान्य मोफत दिले ३ महिने उज्वला योजने अंतर्गत रसोयी गॅस पुरवली आहे. शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान दिलेत.

राज्याचे मुख्यमंत्री घरून बाहेर निघत नाही. ब्रम्हपुरीत भयानक पूर आले असताना केवळ पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली असली तरी अनेकांच्या खात्यात जमा झाली नाही. कृषी विधेयक वर कांग्रेस आंदोलन करीत आहे. कारण शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करायचा नाही. परंतु मोदी सरकार शेतकऱ्यांना बळकट करणार आहे एक भारत एक संविधान करण्याचे वचन पंतप्रधान मोदीनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन विधेयक आणले आहे. नोट बंदी मुळे काळा पैसा बंद झालेला आहे. कृषी बिल मुळे काळाबाजार बंद होणार आहे. तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून लस निर्मिती होईपर्यन्त प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी काळजी घेत जनतेची सेवा करण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले.

मासळ मदनापूर जिप क्षेत्रातील कार्यकर्ता पदाधिकारी कोरोना काळात भाजप सेवा सप्ताह च्या बैठकीत आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते. यावेळी डॉ. श्यामजी हटवादे राजू पाटील झाडे, प्रकाश वाकडे, प्रवीण गणोरकर, डॉ. देवनाथ गंधारे, ओमप्रकाश गणोरकर, गजानन गुळध्ये, समीर राचलवार, असिफ शेख, अशोक कामडी, सुरज नरुले, आदी उपस्थित होते.

डॉ श्यामजी हटवादे यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायदा वर विस्तृत मार्गदर्शन करीत कांग्रेस पक्ष चुकीचा संदेश देत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्रजी मोदीनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे केले येणारे कायदे ची विस्तृत माहिती कार्यकर्त्या पर्यत बुकलेट च्या माध्यमातून येणार असल्याचे सांगितले. पक्षातील कार्यकर्ता कोरोना ग्रस्त आढळल्यास सहानुभूती म्हणून संपर्कात राहून मदत करण्याचे सांगितले.

माजी सभापती राजू पाटील झाडे म्हणाले की कृषी विधेयक वर विरोधी पक्ष आक्रमक होऊन आंदोलन करीत असले तरी कृषी कायदा मुळे शेतकऱ्यांनी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगितले मालाची किंमत जरी कोसळली तरी मिनिमम भाव देऊन सरकार खरेदी करणार आहे बाजार समिती ह्या बरखास्त केल्या नसून त्याच स्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. बाजार समितीने शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मासळ-मदनापूर जिप क्षेत्रातील बूथ अध्यक्ष उपस्थित होते. संचालन गजानन गुळध्ये यांनी केले. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top