- चष्मे वाटप करून सेवा सप्ताहाचा समारोप
- श्री माता कन्यका सेवा संस्थाने केले आयोजन
चंद्रपूर -
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर दोघांचे जीवन देशसेवेत समर्पित होते हे स्पष्ट आहे. गांधीजींनी अहिंसा शिकवली तर लालबहादूर शास्त्री यांनी "जय जवान, जय किसान" चा नारा देत देशाच्या एकतेसाठी सैन्य व कृषिला प्राधान्य दिले. दोघांसाठी देशसेवा सर्वोच्च होती. देशसेवेचा हा धर्म एकतेचा मूलमंत्र आहे. असे प्रतिपादन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ . मंगेश गुलवाडे यांनी केले. ते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून, श्री माता कन्यका सेवा संस्था द्वारा आयोजित चष्मे वाटप कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून महापौर राखीताई कांचर्लावार तर प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर राहुल पावडे, सत्कारमूर्ती श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव राजूभाऊ सुरावार, भाजपा नेते प्रकाश धारणे, नेत्रतज्ञ डॉ. उमेश अग्रवाल, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, नगरसेवक रवी आसवानी, प्रशांत विघ्नेश्वर, सुरज पेदूलवार, प्रज्वलंत कडू, रामकुमार आकापेल्लीवार यांची उपस्थिती होती.
डॉ. गुलवाडे म्हणाले, चंद्रपुरात भारतीय जनता पार्टीने लॉकडाउन काळापासूनच, सेवाकार्य सुरू केले.लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनातून हवी त्यांनाही मदत करण्यात आली. महात्मा गांधींच्या अहिंसा व जनसेवेचा मूलमंत्र भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांनी स्वीकारल्यामूळे, कोविड-१९ चा लढा लढतांना भाजपाची मदत जनतेला होत आहे. हा लढा संपणारा नसल्याने सेवा कार्याची ही सुरवात आहे. पण महानगर भाजपाच्या सेवा सप्ताह (१७ ते २५ सप्टेंबर) चा समारोप, या चष्मे वाटप कार्यक्रमातून होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी महापौर कांचर्लावार म्हणाल्या, शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहचविणे या उदात्त हेतूने भाजपा कार्य करते.आ मुनगंटीवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,श्री माता कन्यका सेवा संस्थेने उत्तम सहकार्य दिले.पण ही संस्था प्रसिद्धीच्या झोतात राहत नाही.
या प्रसंगी प्रास्ताविकात सुभाष कासंगोट्टूवार यांनी सेवा सप्ताह(१७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर)निमित्य घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.मान्यवरांच्या हस्ते राजुभाऊ सुरावार,प्रकाश धारणे व डॉ उमेश अग्रवाल यांचा भगवतगिता देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना प्रकाश धारणे म्हणाले,सेवाकार्य करण्यासाठी निस्वार्थ भाव असला तरच ती सेवा,सेवा असते.असा भाव आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीत दिसून येतो,त्याचा अंगीकार करा.
यावेळी सेवा सप्ताहातील नेत्र तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या गरजू शिबिरार्थ्याना निशुल्क चष्मे वितरित करण्यात आले.यात लीलावती रविदास,मंजर यादव,सुनीता चव्हाण,विनिता मलिक,इंदू उपाध्याय यांचे सह १२ शिबीरार्थींचा समावेश होता.प्रारंभी भारतमातेचे पूजन करून गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन महापौर कांचर्लावार यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.