Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्टुडंट फोरम ग्रुप, कोरपना तर्फे स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारसंबंधी माहिती संकलन मोहीम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या शैक्षणिक माहितीचे संकलन के...

शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -

स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या शैक्षणिक माहितीचे संकलन केले जात आहे. कोरपना तालुक्यातील मुरली अग्रो ही सिमेंट कंपनी दालमिया ग्रुप समूहातर्फे चालविली जाणार आहे. सदर सिमेंट कंपनीत नव्याने भरती केली जाणार असून भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा व त्यांना नोकरीत प्राधान्य मिळावे या हेतूने विश्वासहारक माहिती गोळा करून ती कंपनी व शासनाला सादर करून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळवून देण्याचे कार्य स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे करण्यात येणार आहे.
करिता तालुक्यातील सर्व सुशिक्षित तरुण-तरुणींना ग्रुप तर्फे आवाहन करण्यात येते की, त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून फार्म अचूकपणे भरून ग्रुपला तुमच्या उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या प्रयत्नात मदत करावी. 

स्टुडंट फोरम ग्रुप, कोरपना तर्फे स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारसंबंधी माहितीचे संकलन फॉर्म येथे क्लिक करून बघा

सूचना -
स्टुडंट फोरम ग्रुप तर्फे कोणालाही नोकरी देण्याची हमी अथवा दावा केला जात नाही किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पैशाची मागणी करण्यात येत नाही.
सदर माहितीच्या आधारावर ग्रुप तर्फे कंपनीवर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास संदर्भाने पाठपुरावा केला जाईल. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top