Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माझे कुटुंब माझी जवाबदारी मोहिमेला सहकार्य करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. प्रतिभा धानोरकर यांचे आवाहन, सभा घेऊन गैरसमज केले दूर तालुका प्रतिनिधी - भद्रावती - माझे कुटुंब माझी जवाबदारी या राज्य शासनाच्या मोहिमेबद...

  • आ. प्रतिभा धानोरकर यांचे आवाहन, सभा घेऊन गैरसमज केले दूर
तालुका प्रतिनिधी -
भद्रावती -

माझे कुटुंब माझी जवाबदारी या राज्य शासनाच्या मोहिमेबद्दल सर्वत्र गैरसमज निर्माण झाल्यामुळे विशेषता ग्रामीण भागात या मोहिमेला विरोध होत आहे. मात्र ही मोहीम सर्व सामान्य माणसाच्या आरोग्याच्या हितासाठी सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन भद्रावती वरोरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आ. प्रतिभा धानोरकर यांनी नागरिकांना केली आहे.

भद्रावती नगर परिषद सभागृहात दि.01 अक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आलेल्या बैठकित आ. प्रतिभा धानोरकर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद किंनाके, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या सभेत सदर मोहीमेंबद्दल पसरलेल्या अफवांचे निराकरण करण्यात आले व या मोहिमे अंतर्गत नागरिकांच्या शरीरातील तापमान आक्सीजन आदीची नोंद घेतली जावे गंभीर बाब असलेल्या रुग्णांना केवळ उपचारासाठी दाखल करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली सभेत उपस्थीत नागरिकांच्या प्रश्नांची संपर्क उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top