Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महसूल विभागानंतर आता वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तालुका प्रतिनिधी  भद्रावती - कोरोना लाॅकडाऊनच्या काळात भद्रावती तालुक्यातील रेती माफियांकडून महसूल विभागाने धडक कारवाई करीत लाखो रुपयांचा मह...


तालुका प्रतिनिधी 
भद्रावती -
कोरोना लाॅकडाऊनच्या काळात भद्रावती तालुक्यातील रेती माफियांकडून महसूल विभागाने धडक कारवाई करीत लाखो रुपयांचा महसूल शासनाला मिळवूनदिला असतानाच दि.२९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता वनविभागाने मांगली कंपार्टमेंटमध्ये धाड टाकून सात ट्रॅक्टर्स जप्त केले मांगली कंपार्टमेंटमध्ये अवैधरित्या वाळुची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपले सहकारी क्षेत्र सहाय्यक हनवते, वनरक्षक कांबळे, दोडके आणि शेडमाके यांच्यासह २१९ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये धाड टाकून ७ ट्रॅक्टर्स जप्त केले. सदर ट्रॅक्टर्स हे मंगेश ढेंगळे, मुनाजखाॅं पठाण, क्रिष्णा जीवतोडे, मोहन ठाकरे, अनिल दातारकर यांच्या मालकीचे असल्याचे वनविभागाने सांगितले. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top