Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: घटस्फोटित महिलेवर पोलिसाने केले अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अश्लील व्हिडिओ केला शूट आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स नागपूर - गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर व्हिडिओ काढून तो व्हायरल करण...

  • अश्लील व्हिडिओ केला शूट
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
नागपूर -
गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत ३३ वर्षीय घटस्फोटित महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अत्याचार करणाऱ्या पोलिसाला अटक केली आहे.

विक्रमसिंग जगतसिंग बनाफर वय ३०, रा. नर्मदा कॉलनी, फ्रेण्ड्स कॉलनी, असे अटकेतील पोलीस शिपायाचे नाव आहे. तो पोलीस मुख्यालयात तैनात आहे. ३३ वर्षीय महिला खासगी कंपनीत लिपिक आहे. ती घटस्फोटित असून, अंबाझरी परिसरात राहाते. याच कंपनीत विक्रमसिंग हा कामाला होता. त्यामुळे तो महिलेला ओळखायचा. २०१६ मध्ये तो पोलीस दलात रूजू झाला. पोलीस झाल्यानंतर विक्रमसिंग याने महिलेसोबत ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवले. २०१७ मध्ये पीडित महिलेसह तो बेलतरोडीतील श्रीकृष्णा एनक्लेव्ह येथे राहणाऱ्या मित्राच्या फ्लॅटवर आला. तिथे महिलेला नाश्त्यातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाली. विक्रमसिंग याने तिच्यावर अत्याचार केले. मोबाइलद्वारे अत्याचाराची चित्रफितही काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेचे वारंवार शोषण करायला लागला. सहा महिन्यांपूर्वी विक्रमसिंग याचे लग्न झाले. लग्नानंतर तो महिलेला आणखी त्रास द्यायला लागला. त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून विक्रमसिंग याला अटक केली आहे. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top