Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत जिल्हा स्तरीय समितीची सभा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत नियंत्रण समितीची सभ...

मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस विभागामार्फत शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत नियंत्रण समितीची सभा दर महिन्यात आयोजित करण्यात येते. हि मासिक सभा दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली  होती.

यावेळी, शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीबाबत जिल्हास्तरीय समितीच्या समोर एकूण 14 प्रकरणे सादर करण्यात आली. यामध्ये, सात प्रकरणे पात्र, तीन प्रकरणे अपात्र, चार प्रकरणे प्रलंबित आहेत.

या बैठकीत ऑगस्ट 2020 पर्यतच्या शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी बाबत आढावा घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे नापीकी, कर्जबाजारीपणा, कर्जपरतफेडीचा तगादा, या तीन कारणानी आत्महत्या केल्यास  शासनाकडून आर्थिक मदत देय आहे. शेतकरी कर्जबाजारीपणा आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या वारसास मदत देण्याबाबत आढावा घेण्यात आला.

तसेच ज्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा मुळेच आत्महत्या करण्यात आलेले त्यांच्या वारसाना मदत मिळेल असे तालुका स्तरीय समितीने अहवालात मत व्यक्त केले आहे. इतर कारणाने आत्महत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना हे लाभ मिळणार नाही, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील,  तहसिलदार सचिन पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गजेंद्र मेश्राम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमोद गेडाम, विवेक कोहळे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top