Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओबीसी समाजाच्या प्रलंबित न्याय मागण्याचे निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भद्रावती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे तहसीलदारांना निवेदन तालुका प्रतिनिधी भद्रावती - राज्यात ५२ टक्के असलेला ओबीसी समाजाचा मागण्या व न...

  • भद्रावती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे तहसीलदारांना निवेदन
तालुका प्रतिनिधी
भद्रावती -

राज्यात ५२ टक्के असलेला ओबीसी समाजाचा मागण्या व न्याय हक्कासाठी स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अनेक वर्षे होऊन अद्यापही पूर्ण करण्यात आल्या नाहीत. हा या समाजावर झालेला अन्याय असून राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे करण्यात आलेल्या समाजाचा संविधानिक न्याय मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भद्रावती शाखे तर्फे तहिसलदार महेश शिंतोडे यांना निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनासोबत मागण्याची प्रत सुद्धा देण्यात आली. ५२ टक्के इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काप्रमाणे अद्यापही सोयी सवलती मिळत नाही हि या समाजावर अन्यायकारक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, ओबीसीच्या रिक्त जागाचा अनुशेष त्वरित भरणे, ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरु करणे, ओबीसी कर्मचाऱ्यांचा पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करणे आदी विविध  मागण्या या निवेदनातून सादर करण्यात आल्या. शिष्टमंडळात ओबीसी महासंघाचे पांडुरंग टोंगे, प्रफुल चटकी, अजय जीवतोडे, संदीप गोखरे, सुनील आवारी, नितीन खरवडे, स्वप्नील मोहितकार, राकेश खुसपुरे, उमेश काकडे, हेमंत आवारी, अभय खिरटकर, धनराज आस्वले, चंदू खारकर तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top