Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या दहशतीत शेतातील कामे कसे करायचे - राजु डोहे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
त्या वाघाला जेरबंद करा - शिवसेनेच्या वतीने वनविभागाला निवेदन दोन दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे आश्वासन जिल्हा प...

  • त्या वाघाला जेरबंद करा - शिवसेनेच्या वतीने वनविभागाला निवेदन
  • दोन दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे आश्वासन
  • जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, धनंजय छाजेड, बबन ऊरकुडे, नगरसेवक राजु डोहे यांची उपस्थिती
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजूरा -

राजुरा तालुक्यातील राजुरा व विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून वाघाच्या हल्यात आतापर्यंत १० शेतकरी, शेतमजुरांना आपले प्राण मुखावे लागले आहे. वाघाच्या हल्याने शेतकऱ्यांत जबर भीती निर्माण झाली असून आता शेतात कामे कशी करायची असा प्रश्न नगरसेवक राजु डोहे यांनी वनविभागाला केला आहे. 

निरंतर होत असलेल्या वाघाच्या हमल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुका राजुरा तर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांना वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले कि, वनविभाग वाघाला पकडण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून लवकरच त्याला जेरबंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड, माजी उपजिल्हा प्रमुख बबन ऊरकुडे, नगरसेवक राजु डोहे, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रनित अहिरकर, विधानसभा संघटक नरसिंग मादर, शहर प्रमुख अक्षय गोरे, निलेश गंपावार, उमेश गोरे, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना उपतालुका प्रमुख बंटी मालेकर, आसिफ शेख, स्वप्नील  मोहुर्ले, मोनु सुर्यवंशी, समीर शेख, आकाश बकाने, मंगीचे उपसरपंच वासुदेव चापले, सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, वसिम अन्सारी, नबी पठान, मंगेश दुर्गे, बाळू कुईटे, महिला उपजिल्हा प्रमुख सरिताताई कुडे, वर्षा पंदिलवार, उपतालुका प्रमुख दिपाली बकाने, विभाग प्रमुख कलावती ईदुरवार, विभाग प्रमुख सुनिता जगदाळे, आदिवासी उपतालुका प्रमुख पार्वतीबाई तलांडे, शकुंतला क्षिरसागर, आशाताई ऊरकुडे व शेकडो महिला कार्यकर्त्या,  शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top