- महिलांच्या रक्षणार्थ सपशेल अपयशी तिघाडी सरकारचा जाहीर निषेध !
- राज्यात महिलांवर वाढते अत्याचार व बलात्कारांवर आळा घालण्यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सिंदेवाही -
आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंदेवाही तालुका यांचे नेतृत्वात बेजबाबदार महाविकासआघाडी सरकारच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन काढण्यात आले. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकारला जनमताचा अवमान करून सत्तास्थान गाठता आले परंतु राज्याचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून राजकारभाराचा गाळा हाकण्यात हे तिघाडी सरकार सपशेल तोंडावर आपटले आहे. असे भयावह चित्र दिवसेंदिवस स्पष्ट होत चालले आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचार व बलात्कार लॉकडाऊनच्या काळात आकड्यांचे शिखर गाठत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग, इ. चे सत्र सर्रास सुरू आहे. परंतु सत्तास्थानी असलेल्या बेजबाबदार व निद्रिस्त महाविकासआघाडी सरकारने या संपूर्ण परिस्थितीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे समजते. त्यामुळे या निर्लज्ज, माजुर्ड्या आणि अपयशी तिघाडी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंदेवाही तालुका यांचे नेतृत्वात या बेजबाबदार महाविकासआघाडी सरकारच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन काढण्यात आले.
तसेच याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून महाभकासतिघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आणि महिला आघाडीच्या शिष्टमंडळातर्फे मा. तहसीलदार धात्रक साहेब यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी, जि.प. समाजकल्याण सभापती तथा तालुका महामंत्री नागराज गेडाम, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, पं.स. सभापती सौ. मंदाताई बाळबुद्धे, उपसभापती सौ. शिलाताई किन्नाके, जेष्ठ नेते प्रा. गणविर सर, माजी नगराध्यक्षा सौ. मोहीनीताई गेडाम, गटनेते तथा पं. स. सदस्य रितेश अलमस्त, रनधिर दुपारे, नगरसेवक दिवाकर पुस्तोडे, राजु करकाडे, नगरसेविका सौ. शालीनी बोरकर, सौ. छाया हाडगे यांसह महिला मोर्चाच्या आदी महीलाभगिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.