अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
प.पुज्य.डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित मातृसंघटन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय मार्गदर्शक स्मृतीशेष मार्शल एड. विमलसुर्य चिमणकर सर यांचा आदरांजली कार्यक्रम समता सैनिक दल शाखा राजुरा च्या वतीने ११ ऑक्टो. २०२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, तक्षशिला नगर, बामणवाडा येथे घेण्यात आला. सभेत अनेक मान्यवरांनी सरांना आदरांजली अर्पण केली.
आयुष्यभर आंबेडकरी विचार, तत्वज्ञानाला जागुन आंबेडकरी चळवळ योग्य दिशेने जाण्यासाठी आपल्या बेधडक लेखणी आणि वक्तव्यासह कृतीकार्यक्रमाद्वारे समाजास प्रेरणा देत राहीले. असे विचार अध्यक्षीय स्थानावरून मार्शल विलास नरांजे राष्ट्रीय ट्रेनिंग ऑफिसर यांनी व्यक्त केले.
आंबेडकरी समाजातील वर्तमानातील डळमळीत झालेल्या अवस्थेत सरांच्या जाण्याने आंबेडकरी आंदोलनाची अपरीमित हानी झाली आहे. सदर आदरांजलीच्या कार्यक्रमात मार्शल विवेक बक्षी, विर्दभ बौ.प्रमुख स.सै.दल, मार्शल आनंद दुबे सहसंघटक, मार्शल सर्वानंद वाघमारे, प्रदिप पुणेकर, लवकुमार शिंदे, गोवर्धन चिकाटे, विजय अलोणे, लालचंद वाघमारे, चेतन उमरे, अंकुश भंडारकर, राजकुमार ढोके, महिला विंगच्या मार्शल साधना शिंदे, सुनिता अलोणे, लता कांबळे, मनिषा गावंडे, मनिषा भोंगरे, सुजाता नळे, यशोधरा देठे आणि इतर सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मार्शल श्रीनिल कांबळे, सोनु झाडे, शुभम झाडे, श्रेयस वाघमारे, जिवक सुखदेवे, आदिंनी सहकार्य केले. आदरांजली सभेचे संचलन मार्शल निवारण कांबळे जिल्हा संघटक चंद्रपुर आणि सभेचे कमांडिंग मार्शल प्रसेंजित कांबळे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.