- पिक हानी व जीवीताची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम आदमी पार्टी चे धरने आंदोलन
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
नरभक्षक वाघाची दहशत, पिकहानी व आर्थिक मदत याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारी धोरणाचा विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी शाखा राजरा च्या वतीने दि. १४ ऑक्टॉबर ला दुपारी १२ ते ३ पर्यंत धरने आंदोलन तहसिल कार्यालया समोर तालुकाध्यक्ष रोशन येवले यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या आंदोलनात आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, संघटनमंत्री परमजीतसिंग झगडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जेष्ठ सदस्य मिलिंद गड्डमवार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.