Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महिलांवर होणारे अत्याचार रोखले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करणार - सौ राखी कंचर्लावार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन चंद्रपूरात भाजपचे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद...

  • राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
  • चंद्रपूरात भाजपचे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

हे सरकार कुंभकर्णी झोपेत आहे. राज्यात दिवसाढवळ्या आई बहिणींवर अत्याचार होत आहेत पण सरकारला काहीही देणेघेणे नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत . महिला राज्यात असुरक्षित आहेत. मलांवरील अत्याचार थाम्बवायचे असतील तर,दिशा कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे.या बेफिकीर सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली असून महिलांवर होणारे अत्याचार रोखले नाही तर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी  यांनी दिला.

दि. 12 नोव्हेंबर रोजी भाजपा चंद्रपूर महानगर तसेच भाजप महिलाआघाडी चंद्रपूरच्या वतीने महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शाई फासून , बांगड्या भरून, चपलांचा मार देत  त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ वनिता कानडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संध्या गुरनुले , महापौर सौ राखी कंचर्लावार ,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,  उपमहापौर राहुल पावडे, महानगर भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजप नेते प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी सौ वनिता कानडे , सौ संध्या गुरनुले , मंगेश गुलवाडे यांनी सुद्धा आपल्या भाषणातुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माया मांदाडे यांनी केले.आंदोलनात नगरसेवक चंद्रकला सोयाम ,ज्योती गेडाम ,संगिता खांडेकर ,कल्पना बागुलकर ,छबु वैरागडे, शितल आत्राम ,वनिता डुकरे ,शितल गुरनुले, माया उईके, शीला चव्हाण, शितल कुळमेथे,  पुष्पा उराडे आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. आंदोलनानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top