- रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याचे खासदार अशोक नेते यांचे प्रशासनास निर्देश
- खासदार अशोक नेते यांनी जाणल्या नांदेड, येनोली माल, गिरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या
नागभीड -
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 12 ऑक्टोबर रोजी नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर परिसरातील नांदेड, येनोली माल, गिरगाव इत्यादी गावांमध्ये दौरा करून धानपिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीचंदजी गणवीर, भाजपचे नेते माजी तालुकाध्यक्ष होमदेवजी मेश्राम, नागभीडचे तालुकाध्यक्ष तथा पं स सदस्य संतोष रडके, तहसीलदार चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, नांदेड चे माजी जिप सदस्य शब्बीर शेख, परिशजी शेंडे, भोजराज जी लांजेवार, माजी पोलीस पाटील हिराचंदजी बारसागडे, व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी शेतकऱ्यांना विचारणा केली असता नामदेव आत्राम, बालबुद्धे, गफ्फुर शेख, मधुकर कोसरे, या शेतकऱ्यांनी धानापिकाला खोडकीळ, मावा, तुडतुडा, करपडा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून हातात आलेले पीकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेकदा फवारणी करुनही काहीही फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धानपिक पूर्णत गेल्याने सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे केली.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.