Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरिता स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पंतप...

  • युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरिता स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सन 2020-21 या वर्षाकरिता जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर मार्फत ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. तरी इच्छुक बेरोजगार युवक-युवतींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी केले आहे.

अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये:
या योजनेअंतर्गत उद्योगाकरिता प्रकल्प मर्यादा रुपये 25 लक्ष रुपये असून, सेवा उद्योगाकरिता प्रकल्पाची मर्यादा 10 लक्ष रुपये आहे. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 8वा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. या योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण तयार करण्याकरिता उत्पन्नाची अट नाही. सदर योजना फक्त नवीन उद्योग, सेवा उद्योग सुरू करणार असलेल्या व्यक्तींनाच लागू आहे. तसेच स्वतःचे भाग भांडवल सर्वसाधारण अर्जदाराकरिता 10 टक्के व अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक, स्त्री लाभार्थी, माजी सैनिक व अपंग यांच्याकरिता 5 टक्के राहील, तसेच अनुदानाचे दर सर्वसाधारण अर्जदाराकरिता शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण भागात 25 टक्के राहील. व अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक, स्त्री लाभार्थी, माजी सैनिक व अपंगांकरिता शहरी भागात 25 टक्के तर ग्रामीण भागात 35 टक्के अनुदान राहील.

या योजनेअंतर्गत www.kviconline.gov.in/pmegp portal या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने कर्ज प्रकरणे सादर करावे. कर्ज प्रकरण सादर करताना अर्जदाराने स्वतःचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, प्रकल्प अहवाल, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामीण भागातील उद्योग घटक असेल तर ग्रामीण लोकसंख्यांचा दाखला घेणे आवश्यक आहे. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top