- युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर -
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता12 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये ऑनलाईन शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तरी युवक युवतींनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड यांनी केले आहे.
सदर कार्यशाळेत ऑनलाईन शेतीवर आधारीत विविध उद्योगसंधी,अन्न प्रक्रियावर आधारीत उद्योगसंधी डिजीटल मार्केटिंग, ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योगातील उद्योगसंधी, फळ प्रक्रियातील उद्योगसंधी, पशुसंवर्धवर आधारीत उद्योगसंधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, शासकीय कार्यालयातील विविध योजना, उत्पादक निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने नाहरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, विपणन व्यवस्थापन उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी www.mced.co.in या वेबसाईटवर 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे, मो. न. 9011667717 या क्रमांकावर संपर्क साधावा.













टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.