Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर सैनिक शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोंबर पासून सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 नोव्हेंबर श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा शैक्षणिक सत्र 2021-22...

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 नोव्हेंबर
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा शैक्षणिक सत्र 2021-22 साठी सैनिक शाळा चंद्रपूर येथे प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहे.ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे.  परीक्षा 10 जानेवारी 2021 रोजी होईल. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याची दखल घेऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सैनिकी शाळेचे स्कॉड्रन लीडर नरेश कुमार यांनी केले आहे.

एआयएसएसईई-2021 ही राष्ट्रीय चाचणी  एनटीए संस्थेमार्फत घेतली जाईल. उमेदवार फक्त https://aissee.nta.nic.ac.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेशी संबंधित माहिती, रिक्त जागा, परीक्षेचे वेळापत्रक व पात्रता निकष बुलेटिनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. जी www.nta.ac.in  या  वेबसाईट वर उपलब्ध आहे. उमेदवार एनटीए वेबसाइटवर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची मिळवू शकतात. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top