Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दक्षिण भारतात पावसाचा कहर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंध्र-तेलंगणात मुसळधार पाऊस पूर-पावसात 21 ठार हैदराबादमध्ये 24 तासांत 20 सेंमी पावसाची नोंद 117 वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये धो-धो, केरळमध्ये...

  • आंध्र-तेलंगणात मुसळधार पाऊस
  • पूर-पावसात 21 ठार
  • हैदराबादमध्ये 24 तासांत 20 सेंमी पावसाची नोंद
  • 117 वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये धो-धो, केरळमध्ये येलो अलर्ट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
हेंद्राबाद -

आंध्र प्रदेश, केरळसह दक्षिणेतील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तेलंगणात हैदराबादमध्ये पूरस्थिती असून गेल्या २० वर्षांतील विक्रम पावसाने मोडला आहे. बोवेनपल्ली भागात रस्त्यावर चालणाऱ्या कार पाण्यात तरंगत होत्या. तर बंडलगुडा भागात घरावर दरड कोसळल्याने २ महिन्यांच्या बाळासह ९ जणांचा मृत्यू झाला. या पावसाने तेलंगणात १५ तर आंध्रात ६ बळी घेतले. राज्य सरकारनी सर्व खासगी संस्था, कार्यालये, अनावश्यक सेवांसाठी वर्क फ्रॉम होमच्या सल्ल्यासह गुरुवारपर्यंत सुटी जाहीर केली आहे. पोलिस प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशातही पावसामुळे गजपतीमध्ये १२ गावांमधील ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवले.

११७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये धो-धो
हैदराबादमध्ये मंगळवारपासून बुधवारदरम्यान २४ तासांत २० सेंमी पावसाची नोंद झाली. १९०३ नंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दबावामुळे हा पाऊस पडत आहे.

केरळमध्ये येलो अलर्ट
तेलंगणात हैदराबादसह अनेक ठिकाणी दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असून या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही तीन दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा आहे.

आठवडाभर मुक्काम
दक्षिण पश्चिम मान्सूनचा देशात आणखी एक आठवडा मुक्काम राहू शकतो. यामुळे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह ९ राज्यांत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top