Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोंडपिपरी येथे वाढीव पाणी पुरवठा कामाचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे हस्ते भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहरातील प्रत्येक नागरिकांना मिळणार दररोज ४० ऐवजी ७० लिटर पाणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गोंडपिपरी - शहरात विविध योजनेअंतर्गत अनेक प्रका...

  • शहरातील प्रत्येक नागरिकांना मिळणार दररोज ४० ऐवजी ७० लिटर पाणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गोंडपिपरी -

शहरात विविध योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे विकास कामे होत असून यात आणखी एक विकास कामाची भर पडणार आहे. येणाऱ्या काही दिवसातच शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या या पाणी प्रश्नांची समस्या सुटणार असून लवकरच वाढीव पाणीपुरवठा अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आता 40 लिटर ऐवजी 70 लिटर पाणी मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या वाढीव पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

आयोजित भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष सपना साखलवार, जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता घोनमोडे, उप अभियंता पाटील, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तुकाराम झाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ राजीव सिंह चंदेल, कृउबा उपसभापती अशोक रेचनकर, देविदास सातपुते, नामदेव सांगळे, शंभूजी येलेकर, देवेंद्र बट्टे, श्रीनिवास कंदनुरीवार, विनोद नागापुरे, बालाजी चनकापुरे, संतोष बंडावार, नगरसेविका लता हुलके, कुळमेथे, प्रदीप झाडे, पाणीपुरवठा सभापती चेतन सिंह गौर, नगरसेवक राकेश पुन, बबलू कुळमेथे, काँग्रेस महिला आघाडीच्या शीला बांगरे, वनिता वाघाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक शिवाजी चौक येथे पार पडलेल्या भूमिपूजन सोहळा आठवण नगरपंचायत कार्यालयात वाढीव पाणीपुरवठा कामात च्या भूमी पूजनानंतर चे नागरिकांना मिळणारे लाभ हे विस्तृत रित्या समजून सांगण्यात आले. याप्रसंगी बोलताना क्षेत्र आमदार सुभाष धोटे म्हणाले की, देशातील कुठलेही गाव असो शासन त्याचा विकासात्मक दृष्ट्या विचार करून विविध योजनांमार्फत त्या गावाचा विकास साधण्यास प्रयत्नशील असतो. अगोदर ग्रामपंचायत असलेल्या गोंडपिपरी येथे नगरपंचायत स्थापनेपासून विविध योजनेमार्फत शासनस्तरावरून विकास कमी केल्या गेली.अगोदर नागरिकांना ग्रामपंचायत स्तरावरून प्रत्येक नागरिक 40 लिटर असे पाणी वाटप प्रमाण होते. मात्र ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत होताच आता प्रत्येक नागरिकांच्या वाट्याला सत्तर लिटर प्रति व्यक्ती शुद्ध पेयजल असे आगामी काळात वाटप होणार असून 840 घरांची वस्ती असलेल्या गोंडपिपरी शहरात प्रत्येक घराला नळ योजनेद्वारे जोडण्यात येणार आहे. विरोधकांनी विकास निधी मंजुरी वरून फलकबाजी चे राजकारण न करता विकास निधी येणारच हा शासनाचा उदात्त हेतू आहे व प्रत्येक नागरिकांची मूलभूत गरजांची पूर्तता करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे असे म्हणत आ. धोटे यांनी सांगितले. याप्रसंगी नगरपंचायत कर्मचारी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top