Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विद्यूत शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील घटना मृतदेह अजूनही घटनास्थळीच..... अविनाश रामटेके - प्रतिनिधी विरुर स्टेशन / राजुरा - शेतात काम करीत असताना...

  • राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील घटना
  • मृतदेह अजूनही घटनास्थळीच.....
अविनाश रामटेके - प्रतिनिधी
विरुर स्टेशन / राजुरा -

शेतात काम करीत असताना महावितरण च्या खांबाला स्पर्श होऊन  साठ वर्षीय शेतकरी चा नाहक बळी गेल्याची घटना राजुरा तालुक्यातील चिंचोली येथे घडली. प्राप्त माहिती नुसार विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली येथिल मारोती लोहट वय 60 वर्ष हा आज दुपारी नेहमी प्रमाणे शेतात काम करण्या करीता गेला असता रोडवर असलेल्या आपल्या शेतात कुंपण करीत असताना महावितरण च्या वीज खांबाला वीज प्रवाह सुरू होता. दरम्यान खांबाला स्पर्ष होताच मारोती हा जाग्यावर कोसळला ,त्यावेळी तिथे कुणीच नसल्यामुळे ही बाब लक्षात आली नाही मात्र वडील घरी परत न आल्यामुळे त्याचा मुलगा शेताकडे गेला असता, वडील मृत अवस्थेत आढळले तेव्हा गावकर्यांना सांगितले असता गांवकरी धावून आले व सदर घटने ची माहिती विरुर पोलीस ठाण्यात व महावितरण कंपनीला देण्यात आली. महावितरण च्या दुर्लक्ष मूळे सदर घटना घडल्या चे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतक कुटूंबना योग्य न्याय देण्यात येणार नाही. तोपर्यंत मृत्यूदेहाला हात लावू दिले जाणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. बातमी लिहे पर्यन्त महावितरणच्या एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळावर आलेला नसल्याने मृत्यूदेह जागेवरच आहे.  









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top