- गावात आता एकही बालक कुपोषित राहणार नाही
- शेवगा व इतर पौष्टिक आहार देणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय
- माजी उपसरपंच इरशाद शेख, सघन शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक बृहस्पती साळवे यांची प्रमुख उपस्थिती
विहिरगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक सूर्यवंशी, माजी उपसरपंच इरशाद शेख, सघन शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक बृहस्पती साळवे, रोजगार सेवक होरे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
महाजनवार यांनी सांगितले कि, ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सकस आहार साठी शासनाकडून ग्रामपंचायत ला प्राप्त 2 एकर जमीन स्वच्छ करण्याची सुरुवात व त्या नंतर या जमिनीवर शेवगा व इतर पौष्टिक आहार देणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून भविष्यात या आहाराचा उपयोग गावातील लहान बालकांना व गरोदर मातांना होईल व गाव कुपोषण मुक्त राहण्यासाठी मदत होईल.
माझे कुटुंब माझी जवाबदारी या कार्यक्रमात विहिरगाव वासीयांनी सहभाग घेऊन कोविड 19 पासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा तसेच सामाजिक अंतर राखावे, मास्क चा नियमित वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर न केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, थकीत व नियमित गृहकर व पाणी कर भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. शौचालायचा नियमित वापर करावा, उघडयावर शौचास जाणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, स्वच्छतेचे सर्व नियम पाळावे. जनतेच्या सहकार्याने विहिरगावला गांधीजींच्या स्वप्नातील गाव बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महाजनवर यांनी सांगितले. याप्रसंगी माजी उपसरपंच इर्शाद शेख, बृहस्पती साळवे यांनी सर्वपतोरी सहकार्य करण्याचे आश्वासन महाजनवार यांना या प्रसंगी दिले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.