Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बोरकरांचे प्रश्न जनहिताचे असून शासनाने त्वरित सोडवावे - एड. वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार एड. वामनराव चटप यांची उपोषण मंडपाला भेट बोरकर यांची प्रकृती खालावली, उपोषणाचा आज 5 वा दिवस शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - गडच...

  • माजी आमदार एड. वामनराव चटप यांची उपोषण मंडपाला भेट
  • बोरकर यांची प्रकृती खालावली, उपोषणाचा आज 5 वा दिवस
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -

गडचांदूर येथील “मदन बोरकर यांनी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राट व त्यातील झालेला गैरव्यवहार, अनियमित व गैर कायदेशीरपना यासर्व समस्या सुटण्याकरीता सुरू केलेल्या उपोषणा निमीत्ताने उपस्थित केलेल्या मुद्दा जनहिताच्या दृष्टीने बरेच तथ्य असून या प्रश्नावर जनतेला न्याय मिळावा करीता शासन व जिल्ह्यातील प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा प्रश्न व्यापक जनहित व सार्वजनिक निधी संबंधी असल्यामुळे तातडीने व अग्रक्रमाने सोडविण्यात यावा व उपोषणकर्त्यांना व जनतेला यथाशिघ्र न्याय मिळावा” असे मत राजूरा विधानसभेचे माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी मदन बोरकर यांच्या उपोषण मंडपाला भेटी दरम्यान व्यक्त केले.

गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करून अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी 30 सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा आज 5 वा दिवस लोटूनही शासन प्रशासनाने याची समाधानकारक दखल घेतलेली नाही. बोरकर यांची प्रकृती खालावली असून अनेकांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समर्थन जाहीर केले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top