- अतिदुर्मिळ नाग पकडण्यात जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहू संस्था च्या सर्पमित्रांना यश
- 'आमचा विदर्भ' विशेष वृत्तांत.....
| अतिदुर्मिळ अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबरा |
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
सर्प ही शक्ती आणि प्रजननाची देवता असल्याचे अनेक दाखले आहेत. मात्र यंत्रयुगात या सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्यात तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत.....
भारतात सापांच्या अनेक जाती आहेत मात्र त्यांत हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच जाती विषारी आहेत..... अल्बिनो स्पेक्टेबल कोबरा अत्यंत विषारी म्हणून ओळखला जातो.
अतिदुर्मिळ अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबरा पकडण्यात जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहू संस्था च्या सर्पमित्रांना यश आले असून अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबरा हा अत्यंत विषारी असून हि प्रजाती अतिदुर्मिळ आहे. सविस्तर वृत्त असे कि, ३ ऑक्टोबर शनिवारी तालुक्यातील चंदनवाही गावात गणपत मडावी यांच्या घरी पांढरा-पिवळसर नाग निघाल्याने दहशत माजली. गावातील लोकांनी सर्पमित्रांना साप पकडण्याची हाक दिली. गावकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत जीवनदिप सर्पमित्र व पर्यावरण बहू संस्थेच्या सर्पमित्रांनी अत्यंत चपळ अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबरा अथक प्रयत्नानंतर पकडले.
आमचा विदर्भ शी बोलतांना सर्पमित्रांनी माहिती दिली कि, अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबरा हा अत्यंत दुर्मिळ जमातीचा असून अनुवंशिकतेच्या कारणाने आणि मेनॅलिनच्या कमतरतेने याचा रंग हा पांढरा-पिवळसर झाला आहे. ब्लॅक कोबरा बहुतांश जागी आढळतात, पण अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबरा हा अतिदुर्मिळ आहे. आज पर्यंत "जीवनदीप" ने शेकडो सापांना, ब्लॅक कोबारांना घरातून, शेतातून पकडून जीवनदान दिलेले आहे. अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबराची नोंद स्थानीय वनविभातात करण्यात अली असून पकडण्यात आलेल्या या कोबरा पुन्हा चंदनवाही लगतचा झुडपीत सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. चंदनवाही लगतच का सोडत आहे. अन्य जंगलात का नाही ? यावर विरारले असता सर्पमित्रांनी सांगितले कि अतिदुर्मिळ अल्बिनो स्पेक्टॅक्लेड कोबरा ज्या परिसरात आढळला त्या परिसरात याच प्रकारचे कोबरा राहू शकतात. अन्यत्र सोडल्यास याच्या जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून चंदनवाही लगतचा झुडपात सोडणार असल्याचे सर्पमित्र प्रविण लांडे, अमर पाचारे, संदीप आदे, शेखर खोके, प्रविण दुरबडे, सत्यपाल मडावी, स्वप्नील बट्टे यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०१७ मध्ये अल्बिनो प्रजातीचा चेकर्ड किलबॅक चुनाळा लगतच्या भागात मिळाला होता. त्या अतिदुर्मिळ अल्बिनो प्रजातीचा चेकर्ड किलबॅकची नोंद First Record of Albinism of Leucism in six Speies of Snakes from Central India मध्ये झाली होती. हे येथे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.