Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: JCI राजुरा रॉयल्स कडून मंगी (बु) येथे मास्क व सॅनिटायझर चे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर "आदर्शाचं विकास मॉडे...

  • आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर "आदर्शाचं विकास मॉडेल'' असलेल्या मंगी (बु) येथे , विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारी संस्था JCI राजुरा रॉयल्स द्वारा मंगी येथे भव्य मास्क आणि सॅनिटायझर वितरण तसेच आदर्श शिक्षक सत्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी तहसिलदार डॉ. रविंद्र होळी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत,  रॉयल्स च्या अध्यक्षा सुषमा शुक्ला, मंगी (बु) गावचे सरपंच रसिकाताई पेंदोर, उपसरपंच वासुदेव चापले, माजी जि.प. सदस्य भिमराव पुसाम, पोलिस पाटील व्यंकटराव मुंडे, स्वतंत्रकुमार शुक्ला, विहिरगाव चे  सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन चव्हाण, तंमुस अध्यक्ष प्रकाश वेडमे, माजी अध्यक्ष मोतीराम पेंदोर, जेष्ठ ग्रामस्थ संभाजी लांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमनाई येमुलवार, ग्राम पंचायतीचे सचिव जी.बी. वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, मुख्याध्यापक परशुराम तोडासाम, ग्रा.प. सदस्य शंकर तोडासे, सोनबती मडावी, वसंत मेश्राम, उमाजी यादवराव कोडापे, आदर्श शिक्षक बाबा कोडापे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

ग्रामस्थांकडून तहसीलदार डॉ. रवींद्र होळी व गट विकास अधिकारी रामावत यांचा नागरी सत्कार करण्यात आला, तसेच रॉयल्स कडून प्रत्येक कुटुंबाला दोन मास्क व सॅनिटायझर चे वितरण तसेच आदर्श शिक्षक सत्कार अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पंचाळा येथील सहाय्यक शिक्षिका तृप्ती विकास मेंढूलकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पल्लेझरी, प.स जिवती येथील प्रवीण कडूजी बुच्चे व मंगी खुर्द येथील मुख्याध्यापक परशुराम तोडासाम यांचे आदर्श शिक्षक म्हणून तसेच 10 व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुशिला सत्यनारायण पुरेड्डीवार, मनोज बुटले, बाबा कोडापे, उमाजी यादवराव कोडापे व गजानन चव्हाण यांनी योगदान दिले. प्रास्ताविक परशुराम तोडसाम, संचालन सुशीला पुरेड्डीवार तर आभारप्रदर्शन स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top