Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सर्व्हर चालेना - गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार : विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप विद्यार्थी आणि पालकांकडून विद्यापीठ प्रशासनावर प्रश्नचिन्ह स्थगित झालेल्या प...

  • गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार : विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
  • विद्यार्थी आणि पालकांकडून विद्यापीठ प्रशासनावर प्रश्नचिन्ह
  • स्थगित झालेल्या परिक्षेसंदर्भात लवकरचं विद्यापिठातर्फे कळविण्यात येईल
  • वाचा सविस्तर वृत्त....
सुरज लेडांगे - प्रतिनिधी
गडचांदूर -
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेसाठी मुदत आणि कालावधी आखून दिला त्यानुसार विद्यापीठांनी आपले नियोजन पूर्ण करून परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे अपेक्षित होते. परंतु आज गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून आज विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सकाळी ९:०० वाजता सुरू होणार होत्या, परंतु जवळपास १०:०० वाजेपर्यंत गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेचे संकेतस्थळ बंद होते. विद्यापीठाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर देखील संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता तसेच भीती निर्माण झाली होती. अनेक विद्यार्थ्यांनी घरूनच परीक्षा देण्याची तयारी केली होती, मात्र ह्या सर्व अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांनी नेट कॅफे कडे धाव घेतली. परंतु, तिथेही संकेतस्थळ सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते. 

शेवटी १०:०० वाजता विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अधिसुचना प्रकाशित करून परीक्षेची वेळ बदलण्याची घोषणा केली असून ही परीक्षा दुपारी २:०० वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. विद्यार्थ्यांनी अधिसूचनेचे पालन करत दुपारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक विद्यार्थ्यांचं लॉगिन झालंच नाही, तर काही विद्यार्थ्यांचं लॉगिन होऊन OTP येत नव्हता. तर काहींना प्रश्न सुद्धा दिसत होते, परंतु, जतन होत नव्हते. अशा विविध तांत्रिक अडचणी यादरम्यान विद्यार्थ्यांना येत होत्या. शेवटी परत विद्यापीठाने अधिसूचना जाहीर करून आज होणाऱ्या नियोजित सर्व परीक्षा तांत्रिक अडचणी उद्भवल्याने स्थगित करण्यात येत असून झालेल्या त्रासाबद्दल परीक्षा विभागाने  दिलगिरी व्यक्त केली.व स्थगित झालेल्या परिक्षेसंदर्भात विद्यापीठातर्फे कळविण्यात येईल, अशी अधिसूचना दिली.

वस्तुतः विद्यापीठाने आपले परिक्षेसंदर्भातील संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणी आधीच दुरुस्ती करून सर्व चाचण्या घेऊन तयार करून ठेवणे गरजेचे असतांना, गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुरता गोंधळ उडाला होता. दोन जिल्ह्यापुरते मर्यादित असलेले गोंडवाना विद्यापीठ मूठभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा देऊ शकत नसेल, तर सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा,गुणदान,निकाल देण्याचा दर्जा काय असेल, यावर विद्यार्थी व पालकांकडून विद्यापीठ प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top