Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माणिकगड सिमेंट कंपनीचे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाहतुकीला अडथळा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गडचांदूर - राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती तालुक्याला जोडणारा आदिवासी भागातील असापूर,  कुसु...

  • वाहतुकीला अडथळा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचांदूर -

राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती तालुक्याला जोडणारा आदिवासी भागातील असापूर,  कुसुंबी, नोकरी या सार्वजनिक रस्त्यावर माणिकगड सिमेंट कंपनी ने नियमबाह्य बांधकामाची परवानगी न घेता सायलो क्रेशर रोपे लाईनचे बांधकाम सार्वजनिक रस्त्यावर करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सदर रस्ता वहिवाटीचा व भूमापन नकाशामध्ये नमूद असतांना सुद्धा महसूल विभागाने भूपृष्ठ भूसंपादन अधिकार बहाल केलेले नसतांना या रस्त्यावर अतिक्रमण करून कंपनीने सार्वजनिक रस्ता दोन चुनखडी खदान मध्य भागात तयार करून गावकऱ्यांना जाण्या-येण्या ठिकाणी गेट बसवून अडथळा निर्माण केला होता. संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे महसूल अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने वाद चिघळण्यापूर्वीच कंपनीला द्वार उघडण्यास भाग पाडले होते. मात्र अनाधिकृत बांधकाम रस्तावर असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत असापूर, बोर कुसुंबी रस्ताचे अर्धवटच बांधकाम झाले आहे. सदर रस्ताचे नकाशा प्रमाणे माणिकगड माईन्स कॉलोनी मधून गोवारी गुड्यापर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी परिसरातीलतील आदिवासी नागरिकांनी केली आहे. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top