Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखेर बल्लारपूरात आठवडी बाजार भरला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आठवडी बाजार सुरू करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला केली होती सूचना भाजपा तर्फे भाजी विक्रेत्यांना मास्क चे वित...

  • आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आठवडी बाजार सुरू करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला केली होती सूचना
  • भाजपा तर्फे भाजी विक्रेत्यांना मास्क चे वितरण
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -

कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जवळपास 8 महिन्यापासून बल्लारपूर शहरातील आठवडी बाजार लॉकडाउन होता मध्यनंतरीच्या काळात बल्लारपूर शहरातील कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात बल्लारपूर शहरातील ठोक भाजी विक्रेत्यासाठी बल्लारपूर शहरातील कॉलरी ग्राउंड उपलब्ध करून देण्यात आले होते.

आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असतांना व महाराष्ट्र सरकार मिशन बिगेन अंतर्गत सर्व सेवा हळूहळू सुरू करीत असताना शासनाच्या निर्देशानुसार 15 ऑक्टोबर पासून राज्यातील आठवडी बाजार सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

शिवाय महाराष्ट्र राज्याचे माजी वित्त वन व नियोजन मंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आठवडी बाजार सुरू करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला सूचना केली होती. यानुसार आज बल्लारपूर शहरातील आठवडी बाजार भरल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी बल्लारपूर शहरातील आठवडी बाजार हा बचत भवन परिसर व सार्वजनिक वसंत वाचनालयाच्या मागील परिसरात भरायचा मात्र सद्यस्थितीत त्याठिकाणी दुकान संकुलाचे काम सुरू असल्याने आठवडी बाजार नगर परिषद पासून ते कॉलरी मार्गाने महात्मा गांधी पुतळा परिसर पर्यंत भरत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, माजी अध्यक्ष शिवचंद्र द्विवेदी, महासचिव मनीष पांडे, निलेश खरबडे, गणेश चौधरी, सतीश कनकम, घनश्याम बुराड़कर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांना मास्क चे वितरण केले.

आठवडी बाजार सुरू झाल्यामुळे बल्लारपूर शहरात वर्धा जिल्ह्यातही हिंगणघाट पासून तर लगतच्या तेलंगांना व आंध्रप्रदेश राज्यातील व्यापारी बांधव आपला माल विकण्यासाठी येत असतात कोरोनाचे सावट या आठवडी बाजारावर दिसून येत असले तरी नगर परिषद बल्लारपूर च्या वतीने नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे. 

नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे, मॉस्क चा वापर करावा, बाजारात येतांना लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना पाठवू नये तसेच सॅनिटाईजरचा वापर करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे तसेच आठवडी बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी फिरत्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top