Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलावर वाढते अत्याचार विरोधात भव्य मोर्चा व निदर्शने
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - भाजपा महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने महा विकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर ह...

शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -

भाजपा महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने महा विकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर होणारे बलात्कार, विनयभंग, अत्याचार व हत्याकांड चे सत्र चालुच आहे ह्या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी,युवा मोर्चाच्या वतीने कोरपना बस स्टॉप येथे भव्य आंदोलन करण्यात आले.

तहसिलदार साहेबां मार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री साहेबांना महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले व कडक कायदा करावा अशी विनंती करण्यात आली आंदोलन नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.

यावेळी संजय मुसळे, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी, किशोर बावणे, अमोल असेकर, विजय रणदिवे, ओम पवार, दिनेश खडसे, पद्माकर दगडी, श्रीमती रत्नमाला येवले, सिंधुबाई, पुष्पा आसुटकर, शकुंतला नवले, लिलाबाई, रुक्माबाई शेंडे, एजाज शेख, सुरेखा इंगोले, चांदबाई शेख, सुनिता मांदाडे, लक्ष्मी मेश्राम, शकुंतलाबाई, शोभाबाई, गयाबाई, वर्षाबाई आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top