Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेतीघाटाचे अधिकार महिला बचत गटांना देवून शासनाने खरे महिला सक्षमीकरण करावे - आम आदमी पार्टी ची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारयांशी चर्चा मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर - चिमूर विधानसभेतील वाढत्या रेती त...

  • प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारयांशी चर्चा
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -

चिमूर विधानसभेतील वाढत्या रेती तस्करीला आढा घालण्यासाठी शासनाने त्वरित रेतीघाटाचे लिलाव करावे तसेच लिलाव पद्धतीमध्ये ग्रामीण महिला बचत गटांना प्राधान्य देवून महिलांचे खरे सक्षमीकरण करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टी चे जिल्हाअध्यक्ष सुनील मुसळे, भोजराज सोनी यांच्या उपस्थितीत चिमूर विधानसभा प्रमुख प्रा.डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.  

चिमूर विधानसभेत सध्या भ्रष्टाचाराचे अधिराज्य असून रेती व दारू तस्करी ला उधान आलेले आहे. संपूर्ण विदर्भात चिमूर विधानसभेची ओळख ‘भ्रष्टाचाराची राजधानी’ अशी होत असून भ्रष्टाचारासाठी राजकीय ‘आशीर्वाद’ हा आता सगळीकडे चर्चेचा विषय होत आहे. या सर्व प्रकरणात गुप्तपणे सी.आय.डी. चौकशी होऊन खरे चेहरे समोर आणावे यासाठी आम आदमी पार्टी तर्फे गांधी जयंतीनिमित्त लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते, याची दखलही शासनाने घेतली आहे. 

महिलांचे खरे सक्षमीकरण करायचे असल्यास शासनाने रेतीघाटाचे अधिकार सबंधित गावातील महिला बचत गटांना द्यावे तसेच लिलाव पद्धतीमध्ये ग्रामीण महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे यासबंधी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. या प्रक्रियेत ग्रामीण महिला बचत गटांना आम्ही सामावून घेवू असे आश्वासन भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिले. 

याप्रसंगी आम आदमी पार्टी चे सुनील मुसळे, भोजराज सोनी, प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे, कैलास भोयर, अशोक मेश्राम, विनोद सातपुते, विशाल इंदोरकर, आदित्य पिसे, मंगेश शेंडे, रंजना मेश्राम, नीता धोंगडे,कल्पना मेश्राम, पार्वती रामटेके व अनेक पदाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top