Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराष्ट्रातील आघाडी सरकारने नागरिकांच्या धार्मिक भावनांची हत्या करु नये - पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, तालुका केळापुर ये...

  • महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण संपन्न
  • यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, तालुका केळापुर येथे भाजपा चे उपोषण
श्रावण कुमार - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे आणि मंदीर हे संस्कार, श्रद्धा तसेच विश्वासाच केंद्र आहे. संस्कृती टिकवण्यासाठी संतांनी लढा दिला. मात्र आज हीच संस्कृती संपविण्याचे पाप महाराष्ट्रातील आघाडी सरकार करीत आहे, हे आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे असा घणाघाती आरोप पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपा केळापुर तालुका (जिल्हा यवतमाळ) तर्फे आयोजित महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी पांढरकवडा (जिल्हा - यवतमाळ) येथील गोपाळकृष्ण मंदिरा समोर लाक्षणिक उपोषण दरम्यान केला. 

या लाक्षणिक उपोषणाला वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप जिल्हा सचिव किशोर बावणे, तालुका अध्यक्ष शंकर समृतवार, डॉ. अंगाईतकर, पांढरकवडा नगरसेवक बंटी जुवारे आदी पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील मद्य विक्री केंद्र सुरु करून मंदिर बंद करण्याचे धोरण म्हणजे "मंदिरावर मद्य भारी" असेच आहे. भारत हा मंदिरांचा देश आहे व देशातील मंदिरांची संस्कृती हीच आपली ओळख असतांना हे महाराष्ट्र सरकार आपली ओळखच संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र सरकारच्या धोरणांमुळे  नागरिकांच्या धार्मिक भावनांची हत्या होत आहे मात्र हे पाप भारतीय जनता पार्टी होऊ देणार नाही, आम्ही या सरकार ला नक्कीच टाळ्यावर आणू असा विश्वास यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top