अनंता गोखरे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोना महामारित शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विदयार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जात आहेत. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम रहावे यासाठी श्रमिक एल्गार ने गावात अभ्यासिका वर्ग सुरू केले आहे. अभ्यासिका वर्गात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र घेण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
कोहपरा गावातील विद्यार्थी अभ्यासिका वर्गाचा पुरेपूर फायदा घेत शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावे यासाठी पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे असे आव्हान श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी पालकांना केले आहे. ते शैक्षनिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुलांना नोट बुक, पेन, रंगकांडी इत्यादी साहित्यांचे वाटप मेश्राम यांनी केले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे शिक्षक एल.टी. मडावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असून गावातील पालक ज्ञानेश्वर वाटेकर, विठ्ठल वाटेकर, दीपक मुसळे, बाळू गंदफाले, कुंदा भलवे, सतीश कुळमेथे, मनोहर शेरकी व विद्यार्थी उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.