- शासनाच्या मोहीमेला सहकार्य : फिनिक्स साहित्य मंचाचा जनजागृतीसाठी पुढाकार
चंद्रपूर -
शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृत्ती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात पोंभुर्णा तालुक्यातील गावात कलापथकातून जाणिव जागृती करण्यात आली. जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहीमेचा विशेष प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने प्रसिद्ध कवी, निवेदक नरेशकुमार बोरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० ऑक्टोंबरला ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर कविसंमेलन प्रसिद्ध युवा कवी व कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांच्या अध्यक्षतेत होईल. संचालन कवी मिलेश साकुरकर तर आभार कवी नरेशकुमार बोरीकर करतील. कवीसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन पोंभुर्णा गटविकास अधिकारी तथा कवी संमेलनाचे संयोजक धनंजय साळवे, कवी विजय वाटेकर, कवी नरेंद्र कन्नाके यांनी केले आहे. कविसंमेलनात सहभागी कविंच्या रचना शासन स्तरावर जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना फिनिक्स साहित्य मंचातर्फे सुपुर्द करण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.