Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्याची गरज.....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी यांची मागणी अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजूरा - मध्य चांदा वनविभागा अंतर्गत असलेल्...

  • गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी यांची मागणी
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजूरा -
मध्य चांदा वनविभागा अंतर्गत असलेल्या राजुरा तालूक्यातील राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघाला जेरबंद करणे वा पकडण्या करीता  वनमजूर, वनरक्षक यांना पिंजऱ्यात ठेवण्याची जी नामी शक्कल मध्यचांदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी योजली त्या बध्दल अधिकाऱ्यांचा मानवाधिकार पुरस्कार वा त्या वरचा ही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याची मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी यांनी केली आहे. 

मागिल २२ महिन्या पासून या वाघाने या परिसरात धुमाकूळ घातला असून, राजूरा तालूक्यातील आठ व गोंडपिंपरी तालूक्यातील दोन अशा दहा शेतकऱ्यांचा  बळी घेतला आहे तर तिन शेतकरी वाघाच्या तावडीतून सुदैवाने सुटले असले तरी अपंगत्वाचे ओझे घेऊन जगत आहे. एवढा हा गंभीर प्रकार असूनही वन प्रशासन निद्रावस्थेत होते. शेतकऱ्यांनी या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी अनेकदा निवेदने देऊन वाघाला पकडण्याची मागणी केली मात्र निगरगठ्ठ प्रशासनाला त्यांचे काही घेने देने दिसत नव्हते. पाणी डोक्यावरून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सुस्तावलेल्या वन प्रशासनाला जागे करावेच लागेल या निर्धाराने शेतकरी-शेतमजूरांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला व १२ आक्टोबरला जक्का जाम आंदोलन करण्याचे ठरविले तेव्हा वन अधिकारी खडबडून जागे झाले व वाघ पकडण्याची मोहीम तेज केली. आंदोलनात वाघ पकडण्यासाठी आठ दिवसाची वेळ मागवून आंदोलनातून सुटका करून घेतली. परंतू वैतागलेल्या शेतकऱ्यांनी व लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मीडिया ने मात्र वन अधिकाऱ्यांचा पिच्छा सोडला नाही.

आंदोलनात दिलेले आठ दिवसांचे आश्वासन अंगलट येईल व वाघाला न पकडल्यास शेतकरी पुन्हा आक्रमक होईल म्हणून वनमजूर, वनरक्षकांना वाघ पकडण्याच्या पिंजऱ्यात बसविण्याची नाही शक्कल लढविली.

या अधिकाऱ्यांना तेवढेही भान नाही कि वनमजूर हे याचं भागातील शेतकऱ्यांची मुले आहेत व ते बहूतांशी आदिवासी व ओबीसी समुहातील आहे. वनरक्षक हे ही बहूतांश मागासवर्गीय आहे. हे अमानविय कृत्य म्हणजे मानवाधिकारांच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे. तेवढी साधी भान नसेल तर हे वनांचे व वन्यप्राण्यांचे काय रक्षण करणार ? मानवाला वाघाच्या पिंजऱ्यात बसवून वाघ पकडण्यांचे प्रशिक्षण कुठल्या केंद्रातून घेतले असावे याचे कुतूहल शेतकऱ्यांना आहे. असा प्रयोग आज पर्यंत कुठेही झाल्याचे ऐकवीत नसतांना राजूरा वनविभागात राबविन्यात येत असल्याने या वन अधिकारांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्याची गरज वाटत आहे. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top