Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा वनपरिक्षेत्र खांबाळा गावातील दुसरी व परिसरातील दहावा बळी जनतेचा आक्रोश वन कर्मचारी चिंतेत दहा दिवसापूर्वी नवेगाव येथील वृद्ध शेतकऱ्या...

  • राजुरा वनपरिक्षेत्र खांबाळा गावातील दुसरी व परिसरातील दहावा बळी
  • जनतेचा आक्रोश
  • वन कर्मचारी चिंतेत
  • दहा दिवसापूर्वी नवेगाव येथील वृद्ध शेतकऱ्याला झाला होता मृत्यू
अविनाश रामटेके - प्रतिनिधी
विरूर स्टेशन - राजुरा -
राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा नियत क्षेत्रात काल दिनांक 5 ऑक्टोबर ला वाघाने हल्ला करून खांबाडा येथील मारोती पेंदोर शेतकर्‍याला ठार मारल्याची  घटना उघडकीस आली आहे. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा लोकांचा बळी गेला असून आता या वाघाला ठार केल्याशिवाय लोकांचे जगणे अशक्य होणार असल्याने आता वनविभागाने ह्या वाघाला त्वरित मारावे किंवा शेतकर्‍यांना कुंपणाला करंट लाऊन वाघापासुन आपला बचाव करावा लागेल अशा भावना व्यक्त होत आहेत. 

सविस्तर वृत्त असे की, मारोती पेंदोर याचे खांबाडा गावाला लागून शेत आहे. तो काल दुपारी जवळच असलेल्या कंपार्टमेंट 178 मधील घटना जंगलाशेजारच्या भागात तो पाळीव जनावरांना चरण्यासाठी गेला होता. परंतु घरी परत आला नसल्याने आज सकाळपासून शोध घेतला असता जंगलात वाघाचे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

त्यातल्यात्यात वाघाने मारल्यानंतर त्याच्या शरीराचा जवळपास 60% भाग खाल्याचे समजते ह्यावरून असे दिसते की हा वाघ आता माणसाच्या रक्ताला चटावला नसुन मानवाचे मांस सुद्धा आता ह्याला आवडू लागले आहे. विशेष म्हणजे वाघ हा माणसाला ठार करतो परंतु मांस खात नसल्याचे आढळून आले होते. त्याचप्रमाणे वाघ शिकार केल्यानंतर आधी केवळ रक्त पितो आणि शक्यतो दुसर्‍या दिवशी मांस भक्षण करतो मात्र ही घटना अपवाद असल्याचे सिद्ध होत आहे.

घटनेची माहिती होता वन कर्मचारी घटना स्थळी पोहचले असुन पंचनामा करून त्यांनी शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठवले असल्याचे कळले आहे.

ह्या घटनेने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे ऐन शेतीच्या महत्वाच्या हंगामात अशा घटना घडत असल्याने त्यांची चिंता वाढली असुन वनविभागाने ह्या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा अन्यथा शेतकर्‍यांना कुंपणाला विद्युत करंट लाऊन आपला बचाव करावा लागेल अशी भावना व्यक्त होत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top