शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तहसील मधील गडचांदूर येतील भाजपा शहर महामंत्री हरीश घोरे यांचे विसापूर शेतात सोयाबीन पिकाला ४ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात लोकांनी आग लावली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे सोयाबीन जाळून राख झाले आहे.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने तो मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकरी घोर यांनी सोयाबीनचे पीक कापून ढीग लावले होते; पण रविवारी रात्री कुणीतरी सोयाबीनचे ढीग पेटवून दिले. ज्यामुळे सोयाबीन जळून खाक झाली. यात लाखो रुपये किंमतीच्या शेतकर्याचे ४५ क्विंटल पिकाचे नुकसान झाले आहे. हरीश घोरे यांच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घोरे यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.