- जिल्हा प्रशासनाने दिले उचस्तरिय चौकशीचे आश्वासन
कोरपना -
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात मागील आठ दहा महिन्या पासून प्रशासना कडून शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत चालले असून याकडे स्थानिक शासन सुस्त बसली आहे. दररोजच्या तक्रारी नप ला येऊनही कुठलीही दखल घेतल्या जात नाही. अनेकदा वृत्तपत्रात बातमी झडकूनही सताधारी गप्प का असा प्रश्न गडचांदूर वासींना पडला आहे. भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकरांनी मागील चार महिन्यापासून येथील झालेल्या घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्ट्राचाराची उच्चस्तरीय चौकशी ची मागणी करत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कुठलीही चौकशी होत नव्हती. शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजत आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव जोमाने वाढत आहे. आठ-दहा लोकांचे डेंगू सारख्या रोगाने जीव गेगमवावा लागला असून कित्येक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहे. मदन बोरकर यांनी घनकचरा व्यवस्थापना ठेकेदारा कडून करारनाम्या नुसार काम न करून घेता संगनमताने खोटे बिल तयार करून भ्रष्ट्राचार केला असल्याचा आरोप केला असून त्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी. ठेकेदाराचा परवाना काळ्या यादीत टाकण्यात यावे व दोषी अधिकारी विरुद्ध उचित कार्यवाई व्हावी अशी मागणी करीता दि ३० सप्टेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले होते.
आज दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी उपोषणाच्या 7 व्या दिवशी मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मा. तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक, शिवसेना, भाजपा, मनसे, रीपाई या सर्व पक्षांच्या नेत्यासमक्ष मदन बोरकर यांना घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्ट्राचाराची उच्चस्तरीय चौकशी करिता लवकरच आपण समिती गठीत करू असे आश्वासनपत्र देऊन व शीतपेय पाजून 7 व्या दिवशी त्यांच्या अन्नत्याग उपोषणाचा शेवट केला .
उशिरा का होईना पण प्रशासनाने माझ्या उपोषणाची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्ट्राचाराची उच्चस्तरीय चौकशी करिता आश्वासन दिले व उपविभागीय अधिकारी राजुरा यांना चौकशी करिता नियुक्त केले त्याबाबत बोरकर यांनी जाहीर आभार मानत उपोषण मागे घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.