- पाच दिवसाचा जनता कर्फ्यू
- वाचा - काय राहणार सुरू.... काय राहणार बंद...
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात १६ ते २० सप्टेंबर पर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा आज निर्णय घेण्यात आला. तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी खाडे साहेब, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर, नगर सेवक आनंद दासरी, हरजीत सिंह, सतीश धोटे, अजय बतकमवार, सचिन शेंडे, व्यापारी एसोसिएशन चे उपाध्यक्ष जितेंद्र देशकर, राजू बंदाली, रेकलवार तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तहसील कर्मचारी, नप कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसां पासून राजुरा शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता पादुर्भाव बघता जनता कर्फ्यू लावण्याची मागणी व्यापारी करीत होते. त्यात आज सर्वसंमत्ती ने १६ ते २० सप्टेंबर असा ५ दिवसाचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा आज निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्यू मध्ये दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, पेट्रोल पम्प, न्यूज पेपर वितरण, बँका, शासकीय, निम शासकीय कार्यालये नियमित सुरु राहणार असून, कृषि केंद्र सकाळी ९ ते २, दूध विक्री करिता सकाळी ७ ते ९ दोन तासा करिता सुरु राहणार असून किराणा, भाजी विक्री, फळ विक्री सोबतच सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला. तहसील प्रशासनाना सोबतच व्यापारी एसोसिएशन ने जनता कर्फ्यू ला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.