- 24 तासात आणखी 276 बाधित
- चंद्रपूर शहर व परीसर 136, राजुरा तालुका 6
- वरोरा तालुका 9, बल्लारपूर तालुका 9
- भद्रावती तालुका 12, गोंडपिपरी तालुका 7
- पोंभूर्णा तालुका 21, कोरपना तालुका 7
- सावली तालुका 17, मूल तालुका 21
- नागभीड तालुका 2, चिमूर तालुका 9
- ब्रह्मपुरी तालुका 14, सिंदेवाही तालुका 4
- वणी-यवतमाळ येथून आलेले 2 बाधित
- असे एकूण 276 बाधित पुढे आले आहेत
- चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4662
- 2364 बाधित कोरोनातून झाले बरे
- उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2245
जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगांव येथील 60 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 8 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तर दुसरा मृत्यु आझाद वार्ड वरोरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 2 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 8 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 53 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 49, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 136, राजुरा तालुक्यातील 6, वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9, भद्रावती तालुक्यातील 12, गोंडपिपरी तालुक्यातील 7, पोंभूर्णा तालुक्यातील 21, कोरपना तालुक्यातील 7, सावली तालुक्यातील 17 , मूल तालुक्यातील 21, नागभीड तालुक्यातील 2, चिमूर तालुक्यातील 9, ब्रह्मपुरी तालुक्यातील 14, सिंदेवाही तालुक्यातील 4 तर वणी-यवतमाळ येथून आलेले 2 बाधित असे एकूण 276 बाधित पुढे आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.