- 24 तासात 290 बाधितांची नोंद
- 2526 बाधितांवर उपचार सुरू
- आतापर्यत 3261 कोरोनातून बरे
- चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 5858 वर
- कुठचे आहे मृतक
- ◼️ राजुरा -1
- ◼️ चंद्रपूर शहर -1
- ◼️ ब्रम्हपुरी -1
- ◼️ नागभीड -1
- ◼️ यवतमाळ -1
- वाचा सविस्तर
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये, शिवाजी नगर, खेड ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यू बामणवाडा राजुरा येथील 52 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तिसरा मृत्यू नगीना बाग, चंद्रपुर येथील 37 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 4 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
चवथा मृत्यू वणी यवतमाळ येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 7 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 12 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.
तर, पाचवा मृत्यू बिकली नागभिड येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनिया, हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 71 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 64, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 135, चिमूर तालुक्यातील 12, पोंभूर्णा तालुक्यातील 7, बल्लारपूर तालुक्यातील 33, ब्रह्मपुरी तालुक्यातील 23, भद्रावती तालुक्यातील 13, मूल तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 9, वरोरा तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील 17, सिंदेवाही तालुक्यातील 14, कोरपणा तालुक्यातील 2, गोंडपिपरी तालुक्यातील 3, नागभीड तालुक्यातील 6, वणी- यवतमाळ, वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण 290 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.
वरोरा येथील पद्मालय नगर, अभ्यंकर वार्ड, बोर्डा, पोलीस स्टेशन परिसर, एकार्जूना परिसरातून बाधित ठरले आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द भागातून बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील सोमनाथ पुर, चुनाभट्टी वार्ड, बामणवाडा परिसरातून बाधित ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील तलोधी, राम मंदिर चौक भागातून बाधित पुढे आले आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, विवेकानंद वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, गांधी वार्ड, डॉ.झाकीर हुसेन वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपुर, गुरुदेव वार्ड, गांधी वार्ड, नेहरू वार्ड भागातून बाधित पुढे आले आहेत.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. भद्रावती येथील पंचशील नगर, एकता नगर, नवीन सुमठाणा भागातून बाधित पुढे आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.