- बबनराव संतापले
- स्कुल फीस नहीं भरेंगे, नहीं भरेंगे, नहीं भरेंगे...
- विद्यार्थी-पालकांना फीस आकारणी आणि सत्र परीक्षांच्या मार्कशीट चे आमिष
- शिवसेनानेच्या वतीने आंदोलनाचा इशारा
राजुरा -
कोरोना काळात फीस भरण्यासाठी स्थानिक खाजगी शालेय संस्थांकडून वारंवार विद्यार्थी आणि पालकांना फीस भरण्याची सक्ती होत आहे. अश्या तगाद्याने परेशान अनेक पालकांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे आणि शिवसेना नगरसेवक राजू डोहे यांच्याकडे तक्रारी केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने खाजगी शाळांना आदेश दिले होते की, पालकांककडून जबरदस्ती फी वसुली करु नये आणि फी वाढही करु नये. यासंबंधी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर प्रशासनाने सगळ्या संस्थांना नोटीस पाठवले परंतु तरीही हा प्रकार थांबला नाही.
बबनरावांनी आमचा विदर्भ शी बोलतांना सांगितले कि, कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार महाराष्ट्रात यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाची फीवाढ व सक्तीची वसुली शिक्षण संस्थांना करता येणार नाही. असे असतानाही काही शाळा पालकांवर फी भरण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. अश्या परिस्थितीत जर पालकांना नाहक त्रास सहन करावा लागेल आणि प्रशासनाला त्यावर आवर घालता येत नसेल तर शिवसेना हा प्रश्न स्वतः हातात घेऊन शिवसेना स्टाईल ने तोडगा काढेल. कुठल्याही पालकांनी असल्या प्रकारे फीस भरू नये असे आवाहन शिवसेना राजुराचा करण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.