कोरपना -
शेतकरी शेत मजुर कामगार व्यवसायीका मध्ये चितां वाढत आहे देशाची आर्थिक सुधारणा करण्यात केन्द्र सरकार अपयशी ठरले, थाली बजाओ, दिये जलाओ, घंडी बजाओ असे उपक्रम राबविल्याने समाजाची प्रगती होत नाही. अनेक संघर्षातून राष्ट्रीयकरण करण्यात आलेल्या बँका, कोळश्याच्या खदानी, रेल्वे यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला. असे असताना मैं नहीं बिकाने दूंगा म्हणत रेल्वे, बिएसएनएल, कोळसा खदानी खाजगीकरणाच्या खाईत टाकुन बलाढ्य उद्योगपती यांच्या दावणीला बांधण्याचा घाट रचल्या जात असल्याने विकासावर परिणाम होतांना दिसत आहे. कोरपना येथे राष्ट्रवादी प्रवेश कार्यक्रमात एड. मोरेश्वर टेमुर्डे यानी आपले मत व्यक्त केले. यावेळी कोरपना तालुक्यातील २१ गावातील आजी माजी पदाधिकारी युवकानी काँग्रेस, भाजप, गोंडवाना गणतंत्र पार्टी, शेतकरी संघटनेला राम राम ठोकुन नुकत्याच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे झुंजार नेते आबीद अली यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकत्यानी राष्ट्रवादी पक्षा ची घडी बांघल्याने अनेक गावातील समीकरणाचे गणीत बिघडणार असे चित्र आता निर्माण झाले आहे. यावेळी मोठ्याप्रमाणात युवक व कोरपना येथील अल्पसख्यांक युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. कोडशी (खु.) पिपरी, रामपुर, बेलगाव, चिचोली, पाकडहिरा, सोनुर्ली, वनसडी, कढाली, नवेगाव, कारगाव, मरकागोंदी, हातलोणी, सावलहिरा, मांडवाथिप्पा, कातलाबोडी, कुसळ माथा, अकोला येथील राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा दुपट्टा टाकुन पक्ष प्रवेश देण्यात आला. अरविंद तिरवट, रामजी टेकाम, सुनिल टोगे, सोनु तिखट, नासिम शेख, महादेव पेदोंर, संजय सिडाम, जगदीश कोवे, अंकुश भुसारी, नागेश बांदरकर, बबन कोरांगे, संतोष मानुसमारे, सागर मरस्कोल्हे, अंकुश सौदागरे, मारोती खापने, नादीर कादरी, तेजराव भोयर, मारोती मोडक, भाऊराव डाखरे, दिनेश झाडे, सलमान खान, विजय भगत, चन्दभान तोडासे, खुशाल राठोड यांचे सह शेकडो युवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिपक जैस्वाल, अरूण निमजे, रसिका ढवस, शरद जोगी, यानी विचार मांडले. आबिद अली यांनी राष्ट्रवादी प्रवेशा बाबत प्रभावी व कारण मिमासा करत प्रस्ताविकात विचार मांडणी करूण समर्थकाची दाद घेतली. घोषणा देत सर्वानी राष्ट्रवादी पक्षा च्या प्रवेशात सहभाग दिला संचालन रफिक निजामी यांनी तर आभार विनोद जुमड़े यानी मानले राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डोहे, धनराज जिवने, एकनाथ कुंभारे, नथ्यु पा लोडे उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.