Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आयपीएल 2020
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयपीएल 2020 आयपीएलमध्ये चिअर लिडर्सही नाचणार प्रेक्षकही दिसणार फ्रेंचाईजींनी लढवली शक्कल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स अबुधाबी - इंडियन प्र...

  • आयपीएल 2020
  • आयपीएलमध्ये चिअर लिडर्सही नाचणार
  • प्रेक्षकही दिसणार
  • फ्रेंचाईजींनी लढवली शक्कल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
अबुधाबी -
इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम यंदा संयुक्त अमिरात (युएई) मध्ये खेळला जाणार आहे. भारतामधील वाढत्या कोरोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला. १९ सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्ज आणि गत विजेत्या मुंबई इंडियन्स संघात पहिला सामना रंगणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. मात्र दर्शकांविना होणाऱ्या या स्पर्धेचा माहोल बनवण्यासाठी आयपीएल संघमालकांनी नामी शक्कल लढवली आहे.

मोकळ्या मैदानात होणाऱ्या लढतीत खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी चिअर लिडर्स आणि प्रेक्षकांची खास तजबीज केली जाणार आहे. संघमालक मोकळ्या मैदानात अतिरिक्त स्क्रीनची व्यवस्था करणार असून यावर प्रेक्षकांच्या रेकॉर्ड केलेल्या भावमुद्रा आणि चिअर लिडर्स यांचे व्हिडिओ दाखवले जातील. अर्थात विकेट पडल्यावर, चौकार-षटकार खेचल्यावर टीव्ही स्क्रीनवर चिअर लिडर्स नाचताना दिसतील.

संघमालकांनी लढवलेली ही शक्कल खेळाडूंनाही आवडली आहे. सनरायझर्स हैद्राबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावर प्रतिक्रिया दिली असून यामुळे निश्चितच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल असे म्हटले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मैदान मोकळे ठेवले जाणार आहे. यामुळे अनेक संघमालकांनी चिअर लिडर्स छोटे-छोटे व्हीडिओ आधीच तयार ठेवले आहे. त्या-त्या संघाच्या मैदानावरील लढतीदरम्यान हे व्हीडिओ चौकार, षटकार मारल्यावर चालवले जातील. यामुळे खेळाडूंना आपण मोकळ्या मैदानात खेळतोय असे वाटणार नाही. आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल, व खेळही रोमांचित होईल.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top