Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना विषाणू वुहानच्या लॅबमध्येच तयार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिनी शास्त्रज्ञाकडे पुरावे कोणत्याही विषाणूमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की तो मानवनिर्मित आहे.... वाचा...

  • चिनी शास्त्रज्ञाकडे पुरावे
  • कोणत्याही विषाणूमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की तो मानवनिर्मित आहे....
वाचा सविस्तर....
जगात हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. करोना विषाणूच्या उत्पत्तीवरुन चीनवर पहिल्यापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. अमेरिकापासून युरोपच्या अनेक देशांनी चीना दोषी ठरवत हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा आरोप केला होता. यामध्येच आता चिनी महिला शास्त्रज्ञाची भर पडली आहे.

चीनमधील एका महिला व्हायरोलॉजिस्ट यांनी करोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा खळबळजन दावा केला आहे. तसेच आपल्याकडे याबाबतचे सबळ पुरावे असल्याचंही तिने म्हटलं आहे. या व्हायरोलॉजिस्ट महिला शास्त्रज्ञाचं नाव डॉ. ली मेंग असं आहे. चिनी सरकारच्या धमकीनंतर त्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग म्हणाल्या की, “जगभरात विळखा घालणाऱ्या या करोना महामारीची निर्मिती वुहानमधील लॅबमध्ये उत्पत्ती झाली आहे. हा विषाणू मानवनिर्मित आहे. याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच मी ते जगासमोर आणणार आहे. करोना विषाणूबद्दल चीनने जगापासून खूप काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेत.”

ली मेंग म्हणाल्या की, करोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या मांस बाजारातून झालेली नाही. मांस बाजार ही स्मोक स्क्रीन आहे तर विषाणू निसर्गाची निर्मिती नाही. हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला असून तो मानवनिर्मित आहे. करोना निशाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिटसारखा आहे. याआधारावर हा विषाणू मानवनिर्मित असल्याचं सिद्ध होतं. कोणत्याही विषाणूमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की तो मानवनिर्मित आहे.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top