आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
आम आदमी पार्टी गोधनी (ग्रामीण) संयोजक आकाश काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐच्छिक रक्तदान शिबीर व दंत तपासणी शिबीराचे आयोजन गोधणी येथील फोर ब्रदर्स रेस्टोरेन्ट येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्य त्याच्या संभाषणातून कोविड-19 महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे अश्या परिस्थितीत रक्तदान करून जीवनदान देने ही काळाची गरज आहे व सर्व पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांना शक्य होत असेल त्यांनी रक्तदान अवश्य करावे. तसेच 10 नवीन कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ व टोपी देऊन पार्टीत सामील करण्यात आले.
आकाश काळे यांनी वाढदिवसाचा गाज्यवाज्या न करता कोरोना या गंभीर परिस्थितीत रक्ताचा पुरवठा प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेवर झाले पाहिजे व या महामारीचा कसा सामना करावा याबद्दल माहिती दिली तसेच त्यांनी सर्व जनतेला रक्तदान करण्याकरिता आव्हाहन केले.
रक्तदान शिबिरात जवळपास 60 रक्तदात्यांनी आपले योगदान दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन जय चौहान व गुलशन सुखवानी यांनी केले.
कार्यक्रमात विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपुर सचिव भूषण ढाकुलकर, गोधनी संयोजक आकाश काळे, पश्चिम नागपुर सयोजक आकाश कावळे, जय चौहान, विवेक चापले, रोशन डोंगरे, अमोल हाडके, सचिन लोणकर, अलका पोपटकर, गुलशन सुखवानी, राजेंद्र पारवेकर, आमीर अन्सारी, हरीश गुरबानी, विश्वजित मसराम इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.