- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी दिले उपविभागीय कार्यालयात निवेदन
चिमूर -
शासनाने सन २०२०-२०२१ वर्षाकरिता खरीप हंगामातील शासकीय कापूस विक्री करीता शेतकऱ्यांना नांव नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर येथे दि. १/९/२०२० ते दि. ३१/१०/२०२० पर्यंत होणार आहे. पण शेतकऱ्याच्या सातबारावर पेरापत्रक नोंद २०१९-२०२० असून नोंदणीकरीता शासकीय परिपत्रकाप्रमाणे २०२०-२०२५ पेरापत्रकाची नोंद असल्याशिवाय ऑनलाईन नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करीता नोंद करतांना अडचण निर्माण होत आहे.तेव्हा आपण चिमूर तालुक्यातील सर्व तलाठयांना लेखी आदेश देवून किंवा प्रत्यक्ष बैठक घेवून सन २०२०-२०२१ चे पेरापत्रक नोंद करुन शेतकऱ्यांना सातबारा देण्यास सहकार्य कराल अशा मागणीचे निवेदन देतांना राजु मुरकुटे जिल्हाध्यक्ष रा.काँ. चे रमेश खेरे, अनिल रामटेके, जावेद पठाण, जयंता कांमडी, गणेश चौधरी, रामदास ठुसे, निर्ंजन शेंडे, राजु चौधरी, योगेश ठुणे, अजय चौधरी, धनराज देहाडे, अरुण वाढई, विठ्ठल पेंदाम, विष्णू सावसाकडे, प्रदिप तळवेकर, जनार्दन सातपुते, अमोल लीगे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.