हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला भारत स्वतंत्र भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संघर्षामुळे हैदराबाद येथील निजामाच्या सैन्यावर "पोलो ऑपरेशन" झाले आणि हा भाग आपल्या देशाला जोडण्यात आला. दिनांक 17 सप्टेंबर 1947 ला हैदराबाद मराठवाड्यासह राजुरा भाग स्वतंत्र झाला. या घटनेला आता 74 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिनानिमित्त गेल्या १४ वर्षापासून राजुरा भूषण पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. दिनांक 17 सप्टेंबर 2020 ला होणारा राजुरा मुक्तीदिन सोहळा आता पोस्टपोन करण्यात आला असून आला आहे. अशी माहिती राजुरा मुक्तीदिन दिन समितीचे संयोजक अनिल बाळसराफ, सहसंयोजक मिलिंद गड्डमवार, प्राचार्य दौलत भोंगळे, कार्यक्रम प्रमुख दिलीप सदावर्ते, मिलिंद देशकर, गणेश बेले, सुरेश साळवे, प्रा.विजय आकनूरवार यांनी दिली आहे.
राजुरा मुक्ती दिनाचा सोहळा पुढे ढकलला
राजुरा -
गेल्या 14 वर्षापासून राजुरा येथे नियमितपणे आयोजित करण्यात येत असलेला राजुरा मुक्तीदिन सोहळा कोरनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.