कोरपना -
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस कोरपना तालुका भाजपाच्या वतीने वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.
माननीय माजी वित, नियोजन, वन तथा पालकमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये देवराव भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात कोरपना तालुका अध्यक्ष भाजपा नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात कोरपना ग्रामीण रुग्णालय याठिकाणी रुग्णांना फळ वाटप तसेच ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी कोरपना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, पुरुषोत्तम भोंगळे, किशोर बावणे, अरुण मडावी, डॉ. पुरी ग्रामीण रुग्णालयात कोरपणा, शशिकांत आडकिने, अमोल आसेकर, ॲड. पवन मोहितकर, ओम पवार, बालुभाऊ पानघाटे, दिनेश खडसे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा मोर्चा पदाधिकारी कार्यर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.