Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: काळजी घ्या - जिल्हास्तरावर बेडची संख्या कमी पडत आहे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर शहरात लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गृहविलगिकरणाची सुविधा कॉल सेंटर द्वारे माहिती घेतली जाणार File-Image रमेश निषाद...

  • बल्लारपूर शहरात लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गृहविलगिकरणाची सुविधा
  • कॉल सेंटर द्वारे माहिती घेतली जाणार
File-Image

रमेश निषाद - प्रतिनिधी
बल्लारपूर -
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर व रेपिड रिस्पॉन्स टीम चंद्रपूर यांच्या आदेशानुसार नगर परिषद क्षेत्रातील कोविड लक्षणे नसलेल्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णासाठी गृहविलगीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

याविषयीचा अधिक माहितीनुसार बल्लारपूर शहरात कोरोना रुग्णाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हास्तरावर बेडची संख्या कमी पडत आहे यामुळे बल्लारपूर शहरात वा तालुक्यात कोरोना लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांसाठी होम आयसोलेशन (गृह विलगिकरण) करून त्यांच्यावर घरी राहूनच उपचार करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या निर्देशानुसार पुढील उपाययोजना करण्यात येतील ज्यांच्याकडे स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था आहे ज्यांना कोविड 19 ची लक्षणे नसतील अशा व्यक्तींना गृह विलगिकरणासाठी पात्र ठरविले जाईल या संदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन सोयी सुविधाची तपासणी केली जाईल तसेच गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णाच्या घरी ईतर कोणत्याही व्यक्ती/नातेवाईक यांनी भेट देऊ नये याकरिता होम अंडर आयसोलेशन असा फलक लावण्यात येईल तसेच शासनाच्या माध्यमातून कॉल सेंटर मधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला दिवसातून 2 वेळा कॉल करण्यात येऊन पॉझिटिव्ह रुग्णाची काळजी घेण्यात येईल कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जलद नियोजन व अचूक हालचाली करून परिस्थितीवर मात करने आवश्यक आहे.

म्हणून नागरिकांनी सदर आजाराचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे कोरोना विषाणूंचे लक्षण नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची काळजी घेऊन योग्य तो उपचार करणे हाच होम आयसोलेशन चा मुख्य उद्देश आहे त्यामुळे नागरिकांनी खरी माहीती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपूर, विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी बल्लारपूर, डॉ.पी.जी. मेश्राम वैद्यकीय अधिकारी, डॉ. अतुल कोहपरे तालुका वैद्यकीय अधिकारी इत्यादींनी नागरिकांना आवाहन केले आहे.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top