- जनता कर्फ्युत जिल्हा प्रशासनाने दिली सूट
- महानगर भाजपाने केली होती मागणी
चंद्रपूर -
१३ सप्टेंबरला नीट ची परीक्षा होऊ घातली आहे.या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना बाहेर आहे,त्यांना कोणतीही अडवणूक जनता कर्फ्यु दरम्यान केली जाणार नाही, असे स्पष्ठ आश्वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्याने विद्यार्थी सुखावले आहे.विशेष म्हणजे ही मागणी भारतीय जनता पार्टी महानगरने जनता कर्फ्यु सुरू होण्यापूर्वी केली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर महानगर व बल्लारपूर येथे १० ते १३ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्युचा निर्णय घेतला. याच काळात १३ सप्टेंबरला "नीट" ची परीक्षा आली. ही परीक्षा सहज देता यावी म्हणून पालकांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व महापौर राखी कांचर्लावार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हाधिकारींना निवेदन केले. यावर सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता नीट चा मार्ग मोकळा झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.